News Flash

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर वडिलांकडूनच अत्याचार

देहूरोड भागात एका नराधम बापाने पोटच्या मुलीवरच अत्याचार केल्याची घटना घडली आहे, याप्रकरणी नराधम बापाला अटक करण्यात आली आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

पिंपरी चिंचवड परिसरातील देहू रोड भागात वडिल मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका नराधमाने पोटच्या मुलीवरच अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास देहू रोड पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका १२ वर्षांच्या मुलीवर तिच्या वडिलांनीच अत्याचार केल्याची बाब समोर आली. पीडित मुलीची आई मंगळवारी नातेवाईकांकडे गेली होती. तर पीडित मुलीचा भाऊ बाहेर खेळायला गेला होता. तर मोठ्या मुलाला या नराधमाने जाणून बुजून किराणा आणण्यासाठी पाठवले. त्यानंतर अल्पवयीन मुलीला घराच्या हॉलमध्ये बोलवत कोयत्याच्या धाकाने तिच्यावर अत्याचार केले. तसेच याची वाच्यता कुणाहीकडे करशील तर तुला जीवे मारेन अशी धमकी दिली.

पीडित मुलीने हा सगळा प्रकार आपल्या काकूला सांगितला. मुलीच्या काकूने मुलीच्या आईला फोनवर या सगळ्याची माहिती दिली. त्यानंतर आज पहाटे याप्रकरणी देहूरोड पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली. माझे वडील गेल्या वर्षभरापासून माझ्याशी अश्लील वर्तन करत आहेत अशी कबुली या मुलीने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2018 9:42 am

Web Title: minor girl raped by her father in pimpri chinchwad
Next Stories
1 रेल्वेतील खाद्यपदार्थावर अद्यापही १८ टक्के जीएसटी
2 भाजपच्या दोन आमदारांनी दुपारीच उपवास सोडला!
3 भ्रष्ट कारभारामुळेच पिंपरी-चिंचवडकरांनी ‘बारामतीचे पार्सल’ परत पाठवले
Just Now!
X