News Flash

पुण्यात चेहर्‍यावर ॲसिड फेकण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

आरोपीला अटक

(संग्रहित छायाचित्र)

हिंगणघाटमधील जळीतकांडावर राज्यभर संतापाची लाट उसळली असतानाच पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात एका तरूणाने चेहर्‍यावर ॲसिड फेकण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली असून कोरेगाव पार्क पोलीस तपास करीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क येथील एका इंग्रजी शाळेत मुलगी शिक्षण घेत होती. तिच्या शाळेबाहेर एक तरुण मागील अनेक दिवसापासून थांबत असे. तिचा पाठलाग करीत असे. तुझ्या घरच्यांना मारून टाकीन, तुझ्या चेहर्‍यावर ॲसिड फेकेल, अशी धमकी तो पीडित मुलीला देत असे. त्यानं अशीच धमकी देऊन पीडितेला वाघोली येथे नेऊन तिच्या अत्याचार केला.

या कृत्याचा व्हिडिओ करून हा व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याला तरुणीने त्या आरोपीला नकार दिला. त्यानंतर देखील तरुणाकडून त्रास वाढल्याने संपूर्ण प्रकार मुलीने घरी सांगितला. त्यानंतर प्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली. यावरून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर या प्रकरणाचा तपास कोरेगाव पार्क पोलीस करीत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 4:04 pm

Web Title: minor girl raped in pune bmh 90 svk 88
Next Stories
1 पोहे का केले? पुण्यात नवऱ्याला बायकोनं बदडले
2 Teddy Day: पुणे पोलिस म्हणतायत कुठेही टेडी बेअर दिसला तर आम्हाला कळवा…
3 बहिणीला त्रास देणाऱ्या पतीची मेहुण्याने केली हत्या
Just Now!
X