News Flash

पुण्यातील धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून मावस बहिणीसह अपहरण

मुलींनी घरी गेल्यानंतर कुटुंबाला सांगितला घडलेला प्रकार

प्रातिनिधिक

पिंपरी-चिंचवड शहरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिच्यासोबत असणाऱ्या मावस बहिणीचा विनयभंग करत अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना मंगळवारी रात्री घडली असून बुधवारी उशिरा उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने निगडी पोलिसात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी करण भैरवनाथ साबळे (२१), आशिष आनंद सरोदे (२०), निवास संजय सुतार (२०) , तेजस राजू वाघमारे (१९), कार्तिक उर्फ टिंक्या राजकुमार चव्हाण (२१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “निगडी परिसरात अल्पवयीन मुलीवर आरोपी आशिष आनंद सरोदे याने लौंगिक अत्याचार केला. तसंच, तिच्यासोबत असलेल्या मावस बहिणीचा आरोपीचा मित्र करण भैरवनाथ साबळे याने विनयभंग करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. दोन्ही आरोपींनी इतर तीन मित्रांना बोलावून आपापसात कट रचून दोन्ही मुलींचे अल्टो मोटारीतून अपहरण करून चिंचवड येथे नेल्याचं पीडितने सांगितलं आहे”. पीडित मुलींनी घऱी गेल्यानंतर कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी निगडी पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2020 12:09 pm

Web Title: minor girls sexually harassed in pimpri kjp 91 sgy 87
Next Stories
1 सायबर गुन्ह्य़ांची उकल करण्यासाठी पाच स्वतंत्र कक्ष
2 वर्तुळाकार रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू
3 रक्तक्षय रोखण्याचे आव्हान कायम
Just Now!
X