नाताळच्या काळात प्लम केक, वॉलनट-फ्रुट केक, चीज केकला सर्वाधिक मागणी 

लहानांपासून ज्येष्ठांपर्यंतचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, स्नेहमेळावा, पदोन्नती अशा विविध कारणांसाठी आवडीने केक घेतला जातो. मात्र, आता प्रियजनांच्या आठवणींतील ‘मिस यू’ क्षणांसाठी केक घेतला जात असल्याचा नवा कल तयार होत असल्याचे दिसून येऊ लागले आहे.

shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
3334 children underwent heart surgery under the National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…
Nashik Education Department, Steps Up Efforts, Increase Voter, Turnout Through SVEEP Initiative, Systematic Voters Education and Electoral Participation program, students,
उन्हाळी सुट्टीतही एसव्हीईईपी उपक्रमासाठी धडपड
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये

सध्याच्या नाताळच्या काळात केकला सर्वाधिक मागणी असते. प्लम केक, वॉलनट-फ्रुट केक, चीज केक अशा विविध प्रकारांना केक चाहत्यांकडून पसंती दिली जाते. आनंदी क्षण साजरे करण्यावेळी केक आणणे आता अगदीच स्वाभाविक झाले आहे. तर मनापासून चाहते असणाऱ्यांना केक खाण्यासाठी विशेष असे कारणही लागत नाही.

त्यामुळे केकची बाजारपेठ दिवसेंदिवस विस्तारत असल्याचे दिसून येत आहे. सातत्याने केकची नवनवी दालने सुरू होत आहेत. तसेच खास केकसाठी आकर्षक योजनाही जाहीर केल्या जाऊ लागल्या आहेत. या पार्शभूमीवर, आनंदाच्या क्षणांबरोबरच प्रियजनांच्या आठवणींसाठीही केक घेण्याचा नवा आणि वेगळाच कल समोर आला आहे.

‘वाढदिवस, स्नेहसंमेलन अशा कार्यक्रमांसाठी केक मागवला जातो. पण काही वेळा बाहेरगावी राहणाऱ्या व्यक्तीची आठवण येते म्हणून ‘मिस यू’ लिहिलेला केक मागवला जातो, तर नोकरी-कामानिमित्त बाहेरगावी राहणाऱ्या काही व्यक्तींकडून आठवण म्हणून घरी केक पाठवण्यास सांगितले जाते. त्यामुळे ‘मिस यू’ असे लिहिलेले केक घेण्याचा कल वाढत आहे. यात मिस यू केकला सर्वाधिक मागणी असल्याची माहिती केक उत्पादक अनुष्का जाजू यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

गोड नात्यात असलेल्या तरुण-तरुणींकडून वाढदिवसासारख्या कारणांनी, नोकरदारांकडून पदोन्नती आणि कुटुंबांकडून अन्य कारणांसाठी वरचेवर केकची मागणी येत असतेच. त्याशिवाय अलीकडे ‘ब्रेकअप पार्टी’ करण्यासाठीही तरुणांकडून केक मागवला जाऊ लागला आहे. घरातील प्रिय व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्याप्रमाणेच असलेल्या कुत्र्याच्या स्मरणार्थही केकची मागणी नोंदवली जात असल्याचे दिसून आले आहे.  – प्रसाद कानोलकर, द केक अँड क्रीम फॅक्टरी