पिंपरी विधानसभेचे शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमाद्वारे मतदारासंघातील गावोगावी संपर्क साधण्याचा निर्धार जाहीर केला आहे. त्यानुसार, ते बोपखेल येथून या उपक्रमाची सुरूवात करणार आहेत.
चिंचवड संभाजीनगर येथे शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले,‘‘ मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवण्याच्या हेतूने आपण ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम राबवणार आहोत. बोपखेल येथून त्याची सुरूवात करणार आहे. मतदारांशी संपर्क ठेवणे, त्यांच्या अडचणी समजावून घेणे, ते सोडवणे हा त्यामागे हेतू आहे. सामान्य नागरिकांना दैनंदिन जीवनात ज्या समस्या भेडसावतात, त्याच्याशी संबंधित असलेले अधिकारी या दौऱ्यात सहभागी असतील. नागरिक, अधिकारी यांची संयुक्त बैठक लावून हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. हा उपक्रम सतत पाच वर्षे सुरू राहील.’’

Conspiracy of sugar mills owners against me Raju Shettys allegation
माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप
Shrikant Shinde appeal
कल्याण लोकसभेत व्यक्तिगत कारणांसाठी महायुतीचे वातावरण खराब करू नका, आमदार गायकवाड समर्थकांना खासदार शिंदेंचे आवाहन
Devendra Fadnavis said We have to work with those who have struggled so far
“आतापर्यंत संघर्ष केलेल्यांसोबत काम करावे लागेल”, देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती; इंदापूरचे पालकत्व स्वीकारले
ठाण्यासाठी शिंदे गटाच्या जोर-बैठका; मतदारसंघात उमेदवारीसाठी कार्यकर्ते आग्रही ; भाजपाला जागा जाण्याच्या चर्चेने अस्वस्थता