19 April 2019

News Flash

भाजपा आमदार मेधा कुलकर्णी खेळल्या खो-खो

६ आणि ७ डिसेंबर अशा दोन दिवशी या ठिकाणी खो-खो चे सामने खेळवले जात आहेत

भाजपा आमदार मेधा कुलकर्णी, संग्रहित छायाचित्र

खेळ हा माणसाच्या आयुष्यातला अविभाज्य घटक असतो. मात्र जशा जबाबदाऱ्या पडत जातात तसतसा माणूस खेळापासून लांब जातो. राजकारणाऱ्यांनी खेळ खेळणं हे तर दुरापस्तच असतं. अशात आता पुण्यात भाजपाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी खो-खो या खेळाचा आनंद लुटला. स्वतः खेळ खेळून त्यांनी सीएमचषक खो-खो स्पर्धेचे उद्घाटन केले. पुण्यातील कोथरूड मतदारसंघात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेच्या उद्घटनाच्या सामन्यात मेधा कुलकर्णी यांनी खो-खो हा खेळ खेळला. सौभाग्य खो-खो या नावाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ६ आणि ७ डिसेंबर अशा दोन दिवशी या ठिकाणी खो-खो चे सामने खेळवले जात आहेत. कोथरुडच्या सन्मित्र संघ मैदानावर हे सामने खेळवले जात आहेत. या सामन्यांच्या उद्घटनासाठी आमदार मेधा कुलकर्णी यांनी हजेरी लावली होती. उद्घाटनातला पहिला सामना खेळून त्यांनीही उपस्थितांची मनं जिंकली. या संदर्भातले व्हिडीओही मेधा कुलकर्णी यांनी त्यांच्या ट्विटरवर ट्विट केले आहेत.

First Published on December 6, 2018 4:58 pm

Web Title: mla medha kulkarni also played a game of kho kho with her colleagues during the opening ceremony of kho kho tournament