06 August 2020

News Flash

शिवणयंत्र वाटपास विलंब; मनसेचे पिंपरी पालिकेत आंदोलन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी पालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

  िपपरी पालिकेतील भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ मनसेने गुरुवारी ठिय्या आंदोलन केले.  

 

िपपरी महापालिकेच्या वतीने नागरवस्ती विकास योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या शिवणयंत्र वाटपात दिरंगाई होत असल्याचा मुद्दा पुढे करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी पालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

मनसेचे पालिकेतील गटनेते अनंत कोऱ्हाळे, नगरसेविका अश्विनी चिखले, युवा आघाडीचे प्रमुख सचिन चिखले, राजू सावळे, रूपेश पटेकर आदींसह जवळपास १५० ते २०० महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. मनसेच्या वतीने काढण्यात आलेला हा निषेध मोर्चा पालिकेच्या मुख्यालयात नेण्यात आला. तेथेच कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. महापालिकेच्या नागरवस्ती योजनेअंतर्गत २०१० ते २०१५ या कालावधीत शहरातील महिलांना शिलाई मशीन देण्यात येणार होत्या. त्यासाठी अर्जही मागवण्यात आले होते. त्यापैकी जवळपास १३ हजार महिलांचे अर्ज पात्र ठरवण्यात आले होते. तथापि, गेल्या काही वर्षांपासून पात्र लाभार्थीना शिवणयंत्रांचे योग्यप्रकारे वाटप होत नाही. नगरसेवक सातत्याने पाठपुरावा करतात. मात्र, त्याचा काही उपयोग होत नसल्याचा मुद्दा मनसेने आयुक्त दिनेश वाघमारे यांना दिलेल्या निवेदनात उपस्थित केला आहे. योग्य कार्यवाही न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2016 4:54 am

Web Title: mns agitation in pimpri municipal corporation
Next Stories
1 स्कायडायव्हिंगच्या नव्या विक्रमाची पुण्यामध्ये नोंद
2 परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने महिलांना गंडा
3 स्वातंत्र्योत्तर काळातील दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन
Just Now!
X