कोथरूड येथील २५ एकरपेक्षा अधिक जागेत शिवसृष्टी व्हावी, ही मागणी आता जोर धरताना दिसत आहे. प्रलंबित शिवसृष्टी प्रस्तावाच्या मुद्यावर अद्याप कोणताही निर्णय घेतला जात नसल्यामुळे शुक्रवारी राष्ट्रवादी आणि मनसेने पुणे पालिकेच्या मुख्यसभेत सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी मनसे आणि राष्ट्रवादीच्या सभासदांनी मावळ्यांचा वेशभूषेत सभागृहात हजेरी लावून शिवसृष्टी झालीच पाहिजे, अशी मागणी केली. कोथरूडमधील सर्वे क्रमांक ९२ आणि ९३ मधील सुमारे २५ एकर जागेत शिवसृष्टी उभारण्यास मुख्यसभेने मंजूरी मिळाली आहे. मात्र राज्य शासनाकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. याच जागेवर मेट्रोचे टर्मिनसही प्रस्तावित आहे. मात्र, याबाबत राज्य सरकार आणि महापालिकेने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. या जागेत मेट्रो स्टेशन आणि शिवसृष्टी उभारण्याबाबत महामेट्रोला पत्रही पाठविण्यात आले. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही अनेकवेळा पत्र व्यवहार करून पाठपुरावा केलाय.

दरवर्षीच्या अंदाजपत्रकात शिवसृष्टीसाठी निधीची तरतुद केली जाते. मात्र यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय न घेतल्याने हा विषय अद्यापही प्रलंबित आहे. या मुद्यावर कोथरुड भागातील नगरसेवकांनी अनेक वेळा आंदोलन केले. शुक्रवारी पुणे पालिकेत शिवसृष्टी विषयी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या सुरुवातीला मनसेचे नगरसेवक साईंनाथ बाबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत पालिकेत आल्याचे पाहायला मिळाले. तर मनसेचे गटनेते वसंत मोरे, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नगरसेवक महेंद्र पठारे, योगेश ससाणे, भैयासाहेब जाधव हे मावळयाच्या वेशभूषेत सभागृहात आले होते. यावेळी कोथरुड येथील शिवसृष्टीचा प्रश्न प्रलंबित ठेवल्याप्रकरणी सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवण्यात आला.

nanded lok sabha marathi news, nanded lok sabha latest marathi news
मतदारसंघाचा आढावा : नांदेड; निवडणूक चिखलीकरांची आणि नेतृत्व कसोटी अशोक चव्हाण यांची!
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?
Constitution of India
संविधानभान: मूलभूत हक्कांचे स्वरूप..