पिंपरी-चिंचवड शहराला दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. याविरोधात मनसेच्या महिला शहराध्यक्ष आश्विनी बांगर यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले आहे. यामुळे पोलिसांची भंबेरी उडाली होती. शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांनी हे आंदोलन करत महानगरपालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे. तब्बल दीड तास हे आंदोलन सुरू होते.

water problems in Mira Bhayander area
मिरा-भाईंदरमध्ये भीषण पाणीटंचाई; दोन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद, नागरिकांचे हाल
Water supply stopped in Goregaon Malad Kandivali on Tuesday
मुंबई : गोरेगाव, मालाड, कांदिवलीमध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद
water supply has been restored but complaints of water shortage are still continue
पिंपरी : पाणीपुरवठा पूर्ववत, मात्र तक्रारींचा ओघ
Why three new swimming pools will start in Mumbai How to plan the municipal corporation
पाण्याचा तुटवडा, तरीही मुंबईत तीन नवे जलतरण तलाव का सुरू होणार? महापालिकेचे नियोजन कसे?

पिंपरी-चिंचवड शहराला दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने सर्वसामान्य नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात ९२ टक्के जलसाठा आहे. मात्र, तरीही नागरिकांना दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेत विरोधी पक्षांकडून आंदोलन करून प्रशासनाला वेळोवेळी धारेवर धरले जात आहे. शुक्रवारी मनसेच्या आश्विनी बांगर यांनी ‘ब’ प्रभाग येथील पाण्याच्या टाकीवर चढून घोषणाबाजी करत शोले स्टाईल आंदोलन केले. यावेळी शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी मनसे महिला शहराध्यक्ष आश्विनी बांगर यांनी केली आहे.

दरम्यान, या आंदोलनामुळे पोलिसांची भंबेरी उडाल्याचे पाहायला मिळाले. महानगरपालिकेच्या एक अधिकारी देखील आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित होत्या. आंदोलन करणाऱ्या बांगर यांना ताब्यात घेतलं आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.