02 December 2020

News Flash

राज ठाकरे यांच्यासमोर शांतीपाठाचं पठण, व्हिडीओ व्हायरल

राज ठाकरेंची हिंदुत्वाची भूमिका अजून गडद झाल्याची चर्चा

फाइल फोटो

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत राज ठाकरे यांच्यासमोर शांतीपाठाचं पठण केलं जात आहे. जानेवारी महिन्यात राज ठाकरे यांनी हिदुत्वाची भूमिका घेतली होती. या व्हिडीओमुळे त्यांची हीच भूमिका या व्हिडीओतून ठळक होत असल्याचं बोललं जात आहे. पुण्यात राज ठाकरेंच्या उपस्थितीत काही शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केला. यामध्ये काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचाही समावेश होता. त्यावेळी शांतीपाठाचं पठण करण्यात आलं. वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांच्याकडून हे पठण करण्यात आल्याचं न्यूज १८ लोकमतने वृत्त दिलं आहे.

राज ठाकरेंचा शिवसेनेला धक्का

औरंगाबादमध्ये मनसेने शिवसेनेला धक्का दिला आहे. औरंगाबादमधील सात निष्ठावंत शिवसेनैकांनी मनसेत प्रवेश केला आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. मनसेकडून ट्विट करत यासंबंधी माहिती देण्यात आली. करोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असल्या तरी औरंगाबाद पालिका निवडणुकीत शिवसेनेला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे नेते अनिल शिदोरे आणि अभिजीत पानसे आणि संभाजीनगर जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांच्या उपस्थितीत विविध संघटनांमधील प्रमुख कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करण्यात आला अशी माहिती मनसेकडून ट्विट करत देण्यात आली आहे.

मनसेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये उपशहर प्रमुख, जिल्हा संघटक अशी पदं भूषवलेल्यांचा समावेश आहे. यामध्ये काही माजी नगरसेवकही आहेत. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या पक्षप्रवेशाने पालिका निवडणुकीत समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 2:11 pm

Web Title: mns raj thackeray viral video shantipath in pune sgy 87
Next Stories
1 VIDEO: चंदनाच्या खोडातून साकारलेली गणेशमूर्ती
2 विमानतळाची जागा बदलता येणार नाही
3 पिंपरीत सहा महिन्यांचा मिळकतकर माफ
Just Now!
X