07 March 2021

News Flash

कॅशलेस मेडिक्लेमबाबत रुग्णांना वेठीस धरल्यास आंदोलन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इशारा

‘कॅशलेस’ वैद्यकीय विम्याच्या मुद्दय़ावरून रुग्णांना वेठीस धरल्यास विमा कंपन्या आणि रुग्णालयांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे.

| September 7, 2013 02:40 am

‘कॅशलेस’ वैद्यकीय विम्याच्या मुद्दय़ावरून रुग्णांना वेठीस धरल्यास विमा कंपन्या आणि रुग्णालयांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. विमा कंपन्यांकडून सप्टेंबरच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवडय़ात कॅशलेस मेडिक्लेमबाबत निर्णय घेतला जाणे अपेक्षित आहे.
विमा कंपन्यांनी कॅशलेस विम्यासाठी रुग्णसेवांचे दर निश्चित करण्याच्या मुद्दय़ावरून रुग्णालये आणि विमा कंपन्यांची जुंपली आहे. या दर निश्चितीला विरोध करत रुग्णालयांनी कॅशलेस विम्याची सुविधा नाकारण्याची भूमिका घेतली आहे. कॅशलेस मेडिक्लेमची सुविधा बंद झाल्यास रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी रोख पैसे भरावे लागणार असून विम्याचे संरक्षण नसणाऱ्या नागरिकांना दर निश्चितीमुळे छुप्या दरवाढीचा सामना करावा लागू शकेल, असे पक्षाचे म्हणणे आहे. विमा कंपन्या व रुग्णालयांच्या वादात रुग्ण वेठीस धरले जाणार असतील तर या दोहोंविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष अजय शिंदे यांनी प्रसिद्धिपत्रकात दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 2:40 am

Web Title: mns warns policy co and hospitals regarding cashless mediclaim
Next Stories
1 डॉ. दाभोलकरांचे मारेकरी शोधण्यासाठी पोलीस आयुक्तांचे गणेश मंडळांना साकडे
2 ‘बांधकाम कामगारांच्या विम्यासाठीचा निधी वापरलाच जात नाही’
3 उत्सवापेक्षा मंडळांची, वाद्यांची चर्चा अधिक, असे व्हायला नको – अजित पवार
Just Now!
X