23 April 2019

News Flash

कराडमधील गुंड सल्या चेप्याचा ससूनमध्ये मृत्यू

टोळीयुद्धातून दोन वर्षांपूर्वी गोळीबार

गुंड सल्या चेप्या 

टोळीयुद्धातून दोन वर्षांपूर्वी गोळीबार
महाराष्ट्र केसरी पैलवान संजय पाटील याच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी गुंड सल्या चेप्या ऊर्फ सलीम महमद शेख याचा ससून रुग्णालयात बुधवारी मृत्यू झाला. दोन वर्षांपूर्वी कराड न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या सल्या याच्यावर प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी गोळीबार केला होता. त्याच्या पाठीत गोळी शिरल्याने तो गंभीर जखमी होऊन त्याच्या मणक्यात संसर्ग झाला होता.
सल्या हा येरवडा कारागृहात न्यायालयीन कैदेत होता. कराडमधील गोळीबारानंतर त्याला अर्धागवायूचा झटका आला होता.
त्याच्या पत्नीने त्याला खासगी रुग्णालयात उपचार मिळावेत, असा अर्ज शिवाजीनगर सत्र न्यायालयात मंगळवारी सादर केला होता. आपल्या पतीला कराड, सातारा किंवा पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती त्याच्या पत्नीने न्यायालयाला केली होती. विशेष न्यायाधीश ए.जी. बिलोलीकर यांनी हा अर्ज फेटाळला.
उपचारादरम्यान सल्याचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला, असे ससून रुग्णालयाच्या प्रशासनाने जाहीर केले.

 

First Published on December 24, 2015 1:56 am

Web Title: mohammad salim shaikh death in sasoon hospital