30 September 2020

News Flash

कुत्र्याची पिल्ले सांभाळली म्हणून पुण्यात आई व मुलीला बेदम मारहाण

काळेंविरुद्ध विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काळेंविरुद्ध विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले-पाटील यांनी सांगितले.

भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी महापालिकेची गाडी बोलाविल्यानंतर झालेल्या वादातून श्वानप्रेमी तरुणी आणि तिच्या आईला शिवीगाळ आणि मारहाण केल्याची घटना कोथरूडमधील महात्मा सोसायटीत रविवारी घडला. या प्रकरणी एकाविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मिलिंद काळे (रा. महात्मा सोसायटी, कोथरूड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. यासंदर्भात एका युवतीने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक विक्रम राजपूत यांनी दिली. तक्रारदार युवती वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी आहे. दोन महिन्यांपूर्वी महात्मा सोसायटी भागात एका भटक्या कुत्रीने चार पिल्लांना जन्म दिला. त्यानंतर कुत्रीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर चार पिल्लांचे संगोपन तक्रारदार तरुणी आणि तिच्या आईने केले. सोसायटीच्या आवारात भटकी कुत्री असल्याने तक्रारदार तरुणी आणि तिच्या आईसोबत काही दिवसांपूर्वी काळेंचा वाद झाला होता. या कारणावरून काळेंनी तरुणीला त्रास दिला, असे तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
काळेंनी महापालिकेच्या गाडीला रविवारी दुपारी सोसायटीत बोलावले. भटकी कुत्री पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दोन पिल्ले पकडली. पिल्ले लहान असल्याने त्यांना पकडू नये, असे तरुणीने सांगितले. या कारणावरून पुन्हा काळे आणि तरुणीमध्ये वाद झाला. काळेंनी तरुणी आणि तिच्या आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीचे चित्रण सोसायटीतील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. यामध्ये तरुणीचा एक दातही तुटला, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर काळे तेथून पसार झाले. तरुणी आणि तिच्या आईवर रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले.
काळेंविरुद्ध विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले-पाटील यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2016 4:49 pm

Web Title: molestation case filled against a person for beating women her daughter
Next Stories
1 चर्चा नको आता कृती करा
2 मोर्चाच्या कालावधीत एसटी, पीएमपी सेवा थंडावली
3 Maratha Morcha in Pune: मोर्चातील शिस्तीचे सर्वत्र भरभरून कौतुक
Just Now!
X