केरळमध्ये आज मान्सूनचे आगमन शक्य; नंतर राज्यात लवकर येणार?
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याचे (मान्सून) मंगळवारच्या आसपास केरळात आगमन होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. सध्या महाराष्ट्रात पूर्वमोसमी पाऊस सुरू असून मान्सूनचे प्रत्यक्ष आगमन होईपर्यंत विशेषत: दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण व मराठवाडय़ात तो सुरूच राहण्याची शक्यता आहे.
दोन दिवस रात्री पडलेल्या पावसानंतर पुण्यातील दिवसाचे तापमान चांगलेच खाली आले आहे. सोमवारी पुण्यात २९ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. लोहगावलाही २९.६ अंश तापमान राहिले.
पुढचे सहा दिवस पुणे व परिसरात पावसाचा अंदाज आहे. राज्यातही मंगळवारी उत्तर कोकण व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून बुधवार व गुरुवारी दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. शुक्रवापर्यंत उत्तर कोकण, मराठवाडा व गोव्यातही काही ठिकाणी पाऊस होईल.
‘प्रत्यक्ष केरळात मान्सून आल्यानंतरच महाराष्ट्राची मान्सूनच्या आगमनाची तारीख सांगता येईल, परंतु यंदा मान्सून राज्यात थोडा लवकर येऊ शकेल,’ असे ‘आयएमडी’च्या हवामान केंद्राच्या संचालक सुनीता देवी यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘पुढील ४८ तासांत मान्सून केरळमध्ये येणार असल्याचा अंदाज आहे. केरळनंतर मान्सूनच्या पुढील मार्गक्रमणात तो अनुक्रमे कर्नाटकात व नंतर महाराष्ट्रात येईल. आता महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस पडत असून तो सुरूच राहील. विशेषत: दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण व मराठवाडय़ात मान्सूनच्या आगमनापर्यंत पूर्वमोसमी पावसाचा अंदाज आहे. आताचा पाऊस ढगांच्या गडगडाटासह आहे परंतु मान्सून आल्यावर हळूहळू गडगडणे व विजा चमकणे कमी होईल.’’

weather update marathi news, heat wave maharashtra marathi news
पावसाने माघार घेताच उकाड्यात प्रचंड वाढ, काय आहे हवामानाचा अंदाज जाणून घ्या
In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव
Meteorological department predicted heat wave in Raigad Thane Palghar along with Mumbai Pune
मुंबईसह रायगड, ठाणे, पालघरमध्ये उकाडा वाढणार; यवतमाळ, अकोला, चंद्रपुरात तीन दिवस उष्णतेची लाट
दत्ता जाधव possibility of light rain across maharashtra for four days from 5 april
राज्यात शुक्रवारपासून चार दिवस पावसाचा अंदाज