हवामान विभागाचा अंदाज; राज्यात आज, उद्या पावसाची शक्यता

पुणे : केरळमध्ये गुरुवारी (३ जून) मोसमी वारे दाखल होण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने बुधवारी जाहीर के ले. हवामान विभागाने यंदा सरासरीच्या १०१ टक्के  पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त के ला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सध्या अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय होऊ लागले आहेत. के रळ व लगतच्या समुद्रात ढगांची दाटी होऊ लागली असून, पावसाचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे पुढील २४ तासांत मोसमी वारे के रळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने बुधवारी व्यक्त केला.

वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय नसल्याने तसेच पुरेशा बाष्पाअभावी पावसाने दडी मारल्याने नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे केरळमधील आगमन लांबले. मात्र, आता मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी परिस्थितीमध्ये अपेक्षित अनुकू ल बदल होत आहेत. ढगाळ वातावरण, पश्चिमी वारे जोरदार वाहत असून अनुकू ल पाऊस होत असल्याने गुरुवारी मोसमी वारे के रळमध्ये दाखल होतील, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे अधिकारी के . एस. होसाळीकर यांनी ट्विटरद्वारे दिली.

दरम्यान, गेल्या २४ तासांत कोकणात काही ठिकाणी मुसळधार, मराठवाड्यात अनेक ठिकाणी आणि विदर्भ व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला. विदर्भाच्या अनेक भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट, तर मराठवाड्यात बहुतांश भागात किं चित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

विलंब का?

२१ मे रोजी बंगालच्या उपसागरात ‘यास’ चक्रीवादळ तयार झाले. त्यामुळे मोसमी वाऱ्यांना चाल मिळून २७ मे रोजी मोसमी वाऱ्यांनी श्रीलंके सह मालदीव आणि कोमोरीन समुद्राच्या काही भागांत वाटचाल के ली. यंदा मोसमी वारे नियमित वेळेच्या आधी ३१ मे रोजी के रळात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, मोसमी वाऱ्यांसाठी पोषक स्थिती नसल्याने मोसमी वाऱ्यांचे आगमन लांबले. मोसमी वाऱ्यांची मंदावलेली वाटचाल पुन्हा सुरू झाली असून गुरुवारी (३ जून) सकाळपर्यंत मोसमी वारे के रळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.