News Flash

दुसऱ्या लाटेत पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वाधिक लहान मुले बाधित

ग्रामीण भागात दुसऱ्या लाटेत एक लाख ८५ हजार ४५३ जणांना करोनाची लागण झाली.

प्रतिकात्मक छायाचित्र

जिल्हा प्रशासनाची माहिती

पुणे : करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत एकू ण करोनाबाधितांपैकी लहान मुले बाधित होण्याचे प्रमाण पुणे आणि ग्रामीण भागाच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहरात जास्त असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. दुसऱ्या लाटेत पुणे शहरातील शून्य ते अठरा वयोगटातील ९.९ टक्के , पिंपरी-चिंचवडमध्ये ११ टक्के , तर ग्रामीण भागात हे प्रमाण १०.३ टक्के  होते.

दुसऱ्या लाटेत पुणे शहरात दोन लाख ६६ हजार १३१ जण बाधित झाले. त्यापैकी शून्य ते अठरा वयोगटातील २६ हजार २५७ मुले बाधित झाली, त्यापैकी २५ हजार ६०९ मुले उपचारानंतर बरी झाली आहेत. दोन मुलांचा मृत्यू झाला आहे, तर चारशेपेक्षा जास्त मुलांवर उपचार सुरू आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात दुसऱ्या लाटेत एक लाख ४४ हजार १५४ जणांना करोनाची लागण झाली. त्यापैकी शून्य ते अठरा वयोगटातील १५ हजार ९२८ मुले बाधित झाली असून त्यांचे प्रमाण ११ टक्के  आहे. सध्या साडेचारशेपेक्षा जास्त मुलांवर उपचार सुरू असून १५ हजार ३७३ मुले उपचारानंतर बरी झाली आहेत, तर तीन मुलांचा मृत्यू झाला आहे.

ग्रामीण भागात दुसऱ्या लाटेत एक लाख ८५ हजार ४५३ जणांना करोनाची लागण झाली. त्यापैकी शून्य ते अठरा वयोगटातील १९ हजार १२४ लहान मुले बाधित झाली, हे प्रमाण १०.३ टक्के  एवढे आहे. १८ हजार ५७७ मुले उपचारानंतर बरी झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

दरम्यान, १ मार्च ते ३१ मे या कालावधीतील करोनाबाधित रुग्ण आणि त्यामधील शून्य ते अठरा वयोगटातील मुलांबाबतची ही माहिती आहे. जूनच्या पहिल्या आठवडय़ात उपचारानंतर बरे झालेले किं वा मृत्यूंच्या संख्येत बदल झाले असण्याची शक्यता आहे, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट के ले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 2:41 am

Web Title: more children covid positive in second wave in pimpri chinchwad zws 70
Next Stories
1 कौटुंबिक वादात पुरुषांचीही होरपळ
2 पिंपरी – चिंचवड : ‘वायसीएम’ रूग्णालयात ऑक्सिजन गळती ; नाशिक दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली
3 मराठा आरक्षण: “आयोगाच्या अहवालापूर्वीच पंतप्रधानांकडे मागणी करणं ही केवळ धूळफेक”
Just Now!
X