News Flash

१००हून अधिक तृतीयपंथियांकडून श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आरती

विविधांगी अलंकारांनी सजून आपल्या पारंपरिक वेशभूषेत १०० हून अधिक तृतीयपंथियांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. 

तृतीयपंथींच्या मनातील बाप्पाच्या भेटीची ओढ मंगळवारी श्रीमंत दगडूशेठ गणपतीसमोर पाहायला मिळाली. विविधांगी अलंकारांनी सजून आपल्या पारंपरिक वेशभूषेत १०० हून अधिक तृतीयपंथियांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. 

सामान्य स्त्री-पुरुषांप्रमाणेच समाजातील महत्त्वाचा मात्र बाजूला असलेला घटक म्हणजे तृतीयपंथी. गणपती बाप्पाच्या भेटीची ओढ जशी सामान्य भक्ताला असते. तशी या तृतीयपंथींच्या मनातील बाप्पाच्या भेटीची ओढ मंगळवारी श्रीमंत दगडूशेठ गणपतीसमोर पाहायला मिळाली. विविधांगी अलंकारांनी सजून आपल्या पारंपरिक वेशभूषेत १०० हून अधिक तृतीयपंथियांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या १२६ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवात १०० हून अधिक तृतीयपंथियांनी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी गणेश पेठेतील मंगलामुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टच्या रंजिता नायक, लता नायक, शोभा नायक, दगडूशेठ ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, सुनील रासने, हेमंत रासने यांसह विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते. मंगलामुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टच्या पुणे, मुंबई, गोरखपूर येथील तृतीयपंथियांनी आरती केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 9:18 pm

Web Title: more than 100 transgenders kinnars perform pooja of shrimant dagdusheth ganpati in pune
Next Stories
1 पाहा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची लाईव्ह आरती
2 पुणे महापालिकेच्या नव्या सभागृहात पडला लाकडी ठोकळा, विरोधक हेल्मेट घालून सभागृहात
3 गणेशोत्सव आणि मोहरम एकाच मंडपात साजरा
Just Now!
X