सर्वाधिक लोकसंख्या नेहरूनगर-खराळवाडी प्रभागाची

पिंपरी महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी प्रभागांच्या हद्दी जाहीर झाल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. भौगोलिकदृष्टय़ा मोशी-चऱ्होली सर्वात मोठा प्रभाग ठरला असून भोसरीतील गवळीनगर, तसेच निगडीतील यमुनानगर हे सर्वात छोटे (आकारानुसार) प्रभाग ठरले आहेत. लोकसंख्येनुसार नेहरूनगर सर्वाधिक तर भोसरीतील चक्रपाणी वसाहत सर्वात कमी संख्या असलेला प्रभाग आहे.

यूपीएससीमध्ये मराठी यशवंतांच्या संख्येत घट
Best Coworking Spaces in Pune
कार्यालयीन जागा सहकार्यात पुणे देशात आघाडीवर
Botswana threatening Germany to send elephants
२० हजार हत्तींचं जर्मन कनेक्शन काय? जाणून घ्या
The Central Wildlife Board proposed a highway through the largest tiger project in the country
देशातील सर्वात मोठय़ा व्याघ्रप्रकल्पातून महामार्ग जाणार

पिंपरी -चिंचवड शहरात चारसदस्यीस ३२ प्रभाग होणार असून नगरसेवकांची संख्या १२८ आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, १७ लाख २७ हजार ६९२ लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या ५० हजारच्या जवळपास आहे. शुक्रवारी भौगोलिक रचना जाहीर झाल्या. त्यानंतर, राजकीय पातळीवर वातावरण ढवळून निघाले आहे. प्रभागांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या हद्दी पाहता अनेकांच्या पोटात गोळा आला आहे. भौगोलिकदृष्टय़ा मोशी-चऱ्होली हा सर्वात मोठा प्रभाग ठरला आहे. मोशी गावठाण, गंधर्वनगरी, संत ज्ञानेश्वरनगरचा काही भाग, साई मंदिर परिसर, गोखले मळा, अलंकापुरम सोसायटी, वडमुखवाडी, काळजेवाडी, पठारे मळा, ताजणे मळा, चोविसावाडी, चऱ्होली, डुडुळगाव आदी भाग नव्या प्रभागात समाविष्ट असून प्रभागाची लोकसंख्या ५१ हजार ६२८ इतकी आहे. कमी क्षेत्रफळ असलेल्या प्रभागांमध्ये भोसरीतील चक्रपाणी वसाहत आणि निगडीतील यमुनानगर प्रभागाची नोंद आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वाधिक लोकसंख्या (५९,३९०) प्रभाग क्रमांक नऊची आहे. नेहरूनगर-खराळवाडी-गांधीनगर आणि मासूळकर कॉलनी आदी विस्तृत भाग या प्रभागात समाविष्ट आहेत. सर्वात कमी लोकसंख्या (४९,०४९) भोसरीच्या चक्रपाणी वसाहतीची आहे. या प्रभागात रामनगर, तुकारामनगर, गुरूदत्त कॉलनी, गंगोत्री पार्क, सावंतनगर, महादेवनगर, गवळीनगर, श्रीराम कॉलनी, ज्ञानेश्वरनगर आणि चक्रपाणी वसाहत आदींचा यामध्ये समावेश आहे.