16 December 2017

News Flash

हडपसरमध्ये अंगावर भिंत कोसळून मायलेकींचा मृत्यू

एक लहान मुलगा जखमी

पुणे | Updated: September 29, 2017 9:35 PM

अनिकेतच्या नातेवाईकानी हा हल्ला केल्याचे सांगण्यात येते.

पुणे शहर परिसरात दुपारी दोनच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे भिंत अंगावर कोसळून हडपसरमधील मायलेकींचा मृत्यू झाला असून एक लहान मुलगा जखमी झाला आहे. शीतल नारायण क्षीरसागर (वय २५) व दिव्या नारायण क्षीरसागर (वय ५) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. तर विशाल हा जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी रोड येथील दीपकनगर, गोपाळ पट्टी येथे मुसळधार पावसामुळे घरांचे पत्रे उडून गेले. या परिसरात राहणाऱ्या शीतल क्षीरसागर आणि दिव्या या मायलेकींचा अंगावर भिंत कोसळल्यामुळे मृत्यू झाला. तर एक लहान मुलगा जखमी झाला. पावसामुळे शहरातील ठिकठिकाणी झाडे पडण्याच्या घटना देखील घडल्या.

First Published on September 29, 2017 9:35 pm

Web Title: mother and daughter death collapses wall due to heavy rain in pune