02 April 2020

News Flash

पुणे : दारूड्या नवऱ्याला कंटाळल्याने मुलीला कीटकनाशक पाजून आईची आत्महत्या

दारूच्या नशेत शिवीगाळ व हाताने मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास दिल्याने कंटाळून रागाच्या भरात आत्महत्या केली.

प्रतिनिधिक छायाचित्र

दारूड्या नवऱ्याच्या त्रासामुळे जन्मदात्या आईने चार वर्षांच्या मुलीला विषारी कीटकनाशक पाजून आत्महत्या केल्याची घटना नऱ्हे भागात घडली. या घटनेत मुलगी वाचली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

गोकुळा शामराव साबळे (वय २५, रा. नऱ्हे) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती शामराव राजाराम साबळे (वय २८, शिवशक्ती पॉवर डिव्हाइस शेजारी, नऱ्हे, मूळ- सिरड, शहापूर, ता. औंढा जि. हिंगोली) याच्या विरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कुंडलिक भुरके यांनी या संदर्भात फिर्याद दिली. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक रूपाली पाटील करीत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, शामराव याला दारूचे व्यसन असल्याने त्यांच्यात सतत वाद होत असत. सोमवारी शामरावने दारूच्या नशेत शिवीगाळ व हाताने मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास दिल्याने कंटाळून रागाच्या भरात गोकुळाने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. दोघांचे सात ते आठ वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांना चार वर्षाची मुलगी आहे. गोकुळाने आत्महत्या करण्यापूर्वी पोटच्या मुलीलाही कीटकनाशक पाजले होते. सुदैवाने चिमुरडीचा जीव वाचला. सध्या मुलीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2019 8:36 am

Web Title: mother given rat killed liquid to four year old girl suicide in pune nck 90
Next Stories
1 ‘लोकसत्ता गणेशोत्सव स्पर्धे’साठी प्रवेश अर्जाचे वितरण सुरू
2 इस्रोकडून विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा
3 ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’चे मंगळवारी प्रकाशन
Just Now!
X