News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये आईनेच केला चार वर्षीय चिमुकलीचा खून

या प्रकरणी दोषी महिलेला सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी-चिंचवडमधील सांगवी परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक अशी क्रूर घटना घडली आहे. चार वर्षीय चिमुकली त्रास देत असल्याच्या कारणामुळे आईनेच तिचा खून केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असल्याची माहिती माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी मृत मुलीच्या आईला सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षीय चिमुकलीचा आईने खून केल्याची घटना पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवीत घडली आहे. या प्रकरणी मृत मुलीच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  या महिलेच्या  सासूचा मृत्यू झालेला असल्याने त्यांचा दशक्रिया विधीसाठी या महिलेचे कुटुंबीय आज बाहेरगावी गेले होते. दरम्यान घरात सहा महिन्यांचा मुलगा व चार वर्षांची चिमुकली होती. दरम्यान सकाळी  ही मुलगी त्रास देत असल्याने आईने तिचा खून केला. या मुलीचं  डोकं भिंतीवर आदळलं असण्याची शक्यता असून, तिच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराचे व्रण देखील आहेत. दरम्यान, आरोपी महिलेचे मानसिक संतुलन ठीक नसल्याचेही सांगण्यात येत आहे. घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 2:41 pm

Web Title: mother kills four year old girl in pimpri chinchwad msr 87 kjp 91
Next Stories
1 सरकारच्या नाकर्तेपणामुळं मराठा समाजाच्या भरतीला अप्रत्यक्ष स्थगिती – विनायक मेटे
2 खासगी रुग्णालयांचे बिल सरकारी दरानुसार आहे की नाही याची तपासणार होणार
3 जुलैअखेरीस विविध भागांत पाऊस
Just Now!
X