News Flash

तीन मुलांना गळफास देऊन आईची आत्महत्या

पुण्यातील भोसरी येथील धक्कादायक घटना

पिंपरी-चिंचवडमध्ये एका आईने तीन मुलांना गळफास देऊन स्वतः  आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना  घडली आहे. यात दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. या घटनेमुळे भोसरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अद्याप आईने मुलांचा जीव घेऊन स्वतः आत्महत्या का केली ? हे स्पष्ट झालेले नाही. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत. त्यांचे मृतदेह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत.

फातिमा अक्रम बागवान (वय-२८) असे पोटच्या मुलांचा जीव घेणाऱ्या महिलेचे नाव आहे. तर, अलफिया अक्रम बागवान (वय-९),  झोया अक्रम बागवान (वय-७) आणि जिआन अक्रम बागवान (वय-६) अशी मृत मुलांची नावं आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत फातिमा अक्रम बागवान या चार दिवसांपूर्वीच भोसरी येथे कुटुंबासह राहण्यास आल्या होत्या. पती अक्रम हे फळ विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचा व्यवसाय अगोदर तळेगाव येथे होता. परंतु तिथे मोठे नुकसान झाल्याने ते पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. रविवारी सकाळी अक्रम हे बाहेर गेले असता पत्नी फातिमा यांनी तिन्ही मुलांना गळफास देत त्यांचा जीव घेतला. यानंतर   स्वतः ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

काही दिवसांपूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते, त्यातच पतीला व्यवसायात मोठे नुकसान झाले होते. हे सर्व होत असताना कुटुंबाची फरफट होत असल्याने आज त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. तिन्ही मुलं  सावित्रीबाई फुले या शाळेत शिकत होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2019 8:01 pm

Web Title: mothers suicide after killing owen three children msr 87
Next Stories
1 ‘शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवारांना सोडून जाणार नाही’
2 मराठा क्रांती सेनेचा स्वबळावर १०० जागा लढवण्याचा निर्धार
3 पुणे : इंद्रायणीच्या पुरात 7 तास मृत्यूशी झूंज, घाटावरील समाधीला धरल्याने वाचला जीव
Just Now!
X