News Flash

पिंपरीत मोटार वाहन  निरीक्षकास काळे फासले

पांढरे वाहनांची चाचणी घेत असताना प्रहार संघटनेचे काही कार्यकर्ते तेथे आले.

पिंपरीत मोटार वाहन निरीक्षक आणि प्रहार संघटनेचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार वाद झाला.

पिंपरीत मोटार वाहन निरीक्षकास भर रस्त्यात काळे फासण्याचा प्रकार शुक्रवारी घडला. हा अधिकारी परवाना देण्याच्या कामात गैरव्यवहार करत असल्याचा आरोप करत प्रहार संघटनेने हे आंदोलन केले.

संत तुकारामनगर येथे शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला. मोटार वाहन निरीक्षक सिद्धिराम पांढरे परवाना देण्यासाठी पैशांची मागणी करतात व पैसे वसुलीसाठी त्यांनी स्वतंत्र माणूस ठेवला आहे, असा संघटनेचा आरोप आहे.

पांढरे वाहनांची चाचणी घेत असताना प्रहार संघटनेचे काही कार्यकर्ते तेथे आले. त्यांनी पांढरे यांना जाब विचारला. मात्र, पांढरे काही उत्तर देत नव्हते. त्यांनी कानावर मोबाइल दूरध्वनी ठेवला होता आणि ते कोणाशी तरी बोलत होते. मोटारीत बसून राहिलेले पांढरे आपल्याला प्रतिसाद देत नसल्याचे पाहून संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पांढरे यांना काळे फासले.

त्यानंतर, ते मोटारीतून बाहेर आले आणि मोबाइल कानावर ठेवूनच तेथून दूर निघून गेले. या संदर्भात निरीक्षक पांढरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 2:21 am

Web Title: motor vehicle inspector in pimpri black spots
Next Stories
1 दोन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर बीआरटी बससेवा सुरू
2 आमच्या भागात मेट्रो येणार का ?
3 आठ हजार शाळांना सरकारची ‘किशोर’ भेट!
Just Now!
X