26 October 2020

News Flash

शासनाच्या लेखी गिर्यारोहण म्हणजेच पर्यटन

अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाची राज्य शासनाच्या निर्णयावर टीका

अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाची राज्य शासनाच्या निर्णयावर टीका

पुणे : गिर्यारोहण म्हणजेच पर्यटन असे नवे समीकरण राज्य शासनाने केले आहे.  गिर्यारोहणासारख्या साहसी खेळाचा शासनाने साहसी पर्यटनामध्ये समावेश करून गिर्यारोहकांच्या साहसाची थट्टा केली आहे. करोनामुळे सर्वच गोष्टी थांबलेल्या असताना साहसी खेळाला पर्यटनामध्ये समाविष्ट करण्याची शासनाकडून एवढी घाई का केली जात आहे, असा सवाल अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून साहसी पर्यटन उपक्रम नियमावली संदर्भात प्रस्तावित शासकीय अध्यादेशाचा मसुदा  प्रसिद्ध करण्यात आला. या मसुद्यानुसार गिर्यारोहणासारखा साहसी खेळ महाराष्ट्र राज्यात मात्र पर्यटन म्हणून गणला जाणार आहे. त्याला झिरपे यांनी आक्षेप घेतला आहे.  झिरपे म्हणाले,‘गिर्यारोहण व त्याच्या मोहिमा म्हणजे कठोर प्रशिक्षण, वर्षांनुवर्षांचा अनुभव, काटेकोर नियोजन, कष्टप्रद चढाई, प्रतिकूलतेवर मात करत केलेले साहस. या महत्त्वाकांक्षी खेळाचे पर्यटकीकरण केले, तर  शेर्पा तेनझिंग नोर्गे, सर एडमंड हिलरी आणि सुरेंद्र चव्हाण यांसारखे गिर्यारोहक पर्यटक होते असे म्हणावे लागेल.

हे टाळण्यासाठी हरकती पाठवाव्यात

गिर्यारोहण या जगमान्य साहसी खेळाला आपल्या राज्यातदेखील पर्यटन विभागापासून वेगळे करून साहसी खेळ म्हणूनच क्रीडा विभागात गणले जावे, यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या तीनही संकेतस्थळावर आपापल्या शब्दात हरकती पाठवाव्यात. त्याची प्रत महासंघाच्या giryarohanmahasangh@gmail.com या इमेल वर पाठवावी. जेणेकरून त्याचा पाठपुरावा महासंघातर्फे करता येईल.

पुणे विभागात पाचगणी येथे साहसी पर्यटनाला वाव आहे. मात्र, धोरण निश्चित नसल्याने चालना मिळत नाही. तसेच लोणावळा येथील कामशेत येथे पॅराग्लायडिंग उपलब्ध होऊ शकेल. धोरण निश्चित होऊन प्रत्यक्ष अंमलबाजवणीला सुरुवात झाल्यानंतर साहसी पर्यटनामध्ये सुसूत्रता येईल.

– सुप्रिया करमरकर-दातार, उपसंचालक, पर्यटन संचालनालय, पुणे विभाग

diot@maharashtratourism.gov.in

asdtourism.est_mh@gov.in

www.maharashtratourism.gov.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 12:13 am

Web Title: mountaineering included in adventure tourism by government zws 70
Next Stories
1 अपुरे, अनियमित दूषित पाणी
2 पुणे-सोलापूर मार्गावर मोटार अपघातात पाच जणांचा मृत्यू
3 आरोग्य सुविधा बळकटीकरणाचा प्रवास संथ
Just Now!
X