News Flash

दादा आणि ताईंचे ‘पॉवरफुल’ रक्षाबंधन

राजकीय क्षेत्रातील या 'दादा' आणि 'ताई'चा हा फोटो

Ajit Pawar : खासदार सुप्रिया सुळे यांनीही रक्षाबंधन सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत सुप्रिया सुळे त्यांचे बंधू व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राखी बांधताना दिसत आहेत.

आज राज्यभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. खंडग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर आज भावाला राखी बांधायची किंवा नाही, याबद्दल अनेक बहिणींच्या मनात साशंकता होती. त्यामुळे अनेकजणांनी रविवारीच रक्षाबंधन साजरे केले होते. मात्र, आजही अनेक भाऊ आणि बहिणी राखीपोर्णिमेचा सण तितक्याच उत्साहाने साजरा करत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनीही आज रक्षाबंधन सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. या फोटोत सुप्रिया सुळे त्यांचे बंधू व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राखी बांधताना दिसत आहेत.

मोदींची पाकिस्तानी बहिण, ३६ वर्षांपासून बांधते राखी

राजकीय क्षेत्रातील या ‘दादा’ आणि ‘ताई’चा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेल्या या फोटोत त्यांचे कुटुंबियही दिसत आहेत. याशिवाय, अजित दादा पारंपरिक पद्धतीची टोपी घालून सुप्रिया यांच्याकडून राखी बांधून घेताना दिसतायंत. ‘आजचा रक्षाबंधनाचा सण कुटुंबियांसोबत साजरा केला. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा’, असे सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीदेखील आज ट्विटर अकाऊंटवरून देशवासियांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. तर दुसरीकडे मुंबईत रक्षाबंधनासाठी बाहेर पडलेल्या भावा-बहिणींना बेस्टच्या संपाचा चांगलाच फटका बसत आहे. बेस्टची एकही बस रस्त्यावर धावत नसल्यामुळे रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान अनेकांची काहीशी गैरसोय होत आहे. दुसरीकडे खंडग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी रविवारीच रक्षाबंधन साजरे केले. त्यामुळे काल रविवार असूनही कट्ट्यांवर, मॉलमध्ये तरुणांची झालेली गर्दी आणि ट्रेनमध्ये सहकुटुंब सहपरिवार रक्षाबंधन साजरा करायला निघालेल्या मुंबईकरांची गर्दी झाली होती.

कधी विमानतळावर तर कधी कारमध्ये.. सोनालीने असं साजरं केलं रक्षाबंधन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 11:53 am

Web Title: mp supriya sule celebrates rakshabandhan with ncp leader ajit pawar
Next Stories
1 भाजप सरकारकडून विनाशाचे राजकारण
2 अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीएची कारवाई
3 पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; थरारक व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X