News Flash

११ ऑक्टोबर, १ आणि २२ नोव्हेंबरला परीक्षा

‘एमपीएससी’कडून सुधारित वेळापत्रक जाहीर

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) पदभरतीसाठीच्या तीन परीक्षांचे सुधारित वेळापत्रक सोमवारी जाहीर के ले. त्यानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २२ नोव्हेंबर आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबरला होणार आहे.

सुधारित वेळापत्रक आयोगाने संके तस्थळावर प्रसिद्ध के ले आहे. एप्रिल आणि मेमध्ये होणाऱ्या या परीक्षा करोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर या परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्याचे नियोजन होते. मात्र, करोना संसर्ग अद्यापही आटोक्यात आला नसल्याने मंत्रिमंडळाच्या २६ ऑगस्टला झालेल्या बैठकीत सप्टेंबर आणि ऑक्टोबरमधील परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. आता आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २२ नोव्हेंबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबरला होणार आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने, उमेदवार आणि परीक्षा आयोजनातील सर्व कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी आयोगाकडून शक्य त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच करोना प्रादुर्भावाच्या स्थितीच्या संदर्भात शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा वेळोवेळी आढावा घेऊन त्याबाबतची माहिती आयोगाच्या संके तस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे आयोगाच्या परीक्षा पूर्व सहसचिवांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 12:36 am

Web Title: mpsc announces revised schedule abn 97
Next Stories
1 नव्या शैक्षणिक धोरणाचा ऊहापोह
2 ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरुप यांचं निधन
3 चिंताजनक! पुण्यात दिवसभरात ३७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू; नव्याने आढळले २०५३ रुग्ण
Just Now!
X