‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा’तर्फे (एमटीडीसी) ६ जुलै रोजी पुण्यात एका दिवसाच्या वारी दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. कात्रजपासून सुरू होणाऱ्या या सहलीत लोणंदला संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे दर्शन घेता येणार आहे. भाविक व पर्यटकांना या सहलीत कात्रज ते लोणंद असा प्रवास करुन पालखीचे दर्शन घेऊन पुढे तरडगावपर्यंत वारीबरोबर राहता येईल आणि रात्री ९ पर्यंत सहल चांदणी चौक येथे परत येईल. ही सहल सशुल्क असून इच्छुक पर्यटक अधिक माहितीसाठी (०२०) २६१२६८६७ किंवा २६१२८१६९ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क करु शकतील, असे एमटीडीसीने कळवले आहे.