News Flash

“मुंबईकर वाहतुकीचे नियम पाळतात पण पुणेकर थोडे धीट आहेत”

"पांढरा, काळा, हिरवा शर्ट घाला पुणेकर कोणालाही जुमानत नाहीत. पण..."

प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य : पीटीआय)

काही राज्यात वाहतूक नियमांचे पालन होते. मुंबईमध्ये देखील काही प्रमाणात पोलिसांना नागरिक घाबरतात, पांढरा शर्ट दिसला तरी लांबूनच मुंबईकर गाडीला ब्रेक मारतात. याबाबतीत पुणेकर थोडे धीट आहेत, पोलिसांनी कोणत्याही कलरचा शर्ट घातला तरी ते थांबत नाहीत. पण, आता पुण्याची लोक घाबरायला लागले आहेत. ते घाबरतात हेच खूप आहे असे अशी कोपरखळी मराठी अभिनेते विजय पाटकर यांनी पुणेकरांना लगावली आहे. ते गुरुवारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने आयोजित केलेल्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

आपण वाहतुकीचे बेसिक नियमही पाळत नाही. लोकं वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत ही एक कॉमेडीच आहे, असं म्हणत त्यांनी वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांना पाटकर यांनी खोचक टोला लगावला आहे. पुढे म्हणाले की, परदेशात मध्यरात्री तीन वाजता वाहतुकीच्या नियमांचे पालन तेथील नागरिक करतात. पण, आपल्या इथे भरदिवसा तीनच्या सुमारास चालक सुसाट असतात, असंही पाटकर यांनी परदेशातील नियमांशी तुलना करताना सांगितलं.

जे काही अपघात घडतात ते केवळ वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यामुळे. आपल्या देशात काही राज्यात वाहतुकीचे नियम पाळले जातात. मुंबईत देखील नियमांचे पालन होते. मुंबईत नागरिक वाहतूक पोलिसांना घाबरतात. पुण्यात धीट माणसं आहेत. पांढरा, काळा, हिरवा शर्ट घाला ते कोणालाही जुमानत नाहीत. पण आता पुण्याचे लोक पोलिसांना घाबरायला लागलेत. पुण्याचे लोक घाबरतात हेच खूप आहे. रस्ता सुरक्षेचे नियम मुलासाठी, स्वतःसाठी, कुटुंबासाठी पाळूयात यामुळे आपल जीवन आणखी सुरळीत होईल असं आवाहन देखील पाटकर यांनी आपल्या खास विनोदी शैलीचा तडका देत पुणेकरांना केलं.

या कार्यक्रमाला अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डीसले, वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षण सतीश नांदूरकर, मोहन जाधव यांच्यासह वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहतूक चालकांना पोलीस अधिकारी आणि अभिनेते पाटकर यांनी गुलाबाचे फुल देऊन अभिनंदन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 9:08 am

Web Title: mumbai people fear police but pune people are brave as they dont care about it says marathi actor vijay patkar kjp 91 scsg 91
Next Stories
1 विकासकामे दाखविण्यासाठी खटाटोप
2 निवडणुकांच्या तोंडावर भूमिपूजन, उद्घाटनांचा धडाका
3 शहराच्या वाढीव पाण्याबाबत निर्णयाची शक्यता
Just Now!
X