News Flash

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत मुंबई पोलिसांचा छापा

दरम्यान, या कारवाईसंदर्भात कुरकुंभ एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली नव्हती.

संग्रहित छायाचित्र

सुमारे १०० कोटींचे मेफे ड्रोन जप्त; कंपनीचा मालक अटकेत

दौंडनजीक असलेल्या कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीतील सुजलाम केमिकल्स कंपनीवर मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने बुधवारी छापा टाकला. या कंपनीत मेफे ड्रोन (एमडी) या अमली पदार्थाची निर्मिती केली जात होती. मुंबई पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शंभर कोटी रुपये असल्याचे समजते. या प्रकरणी सुजलाम केमिकल्स कंपनीचा मालक हरिश्चंद्र दोरगे याला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) एका कंपनीत बंदी घातलेल्या एमडी नामक अमली पदार्थाची निर्मिती केली जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली. पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने कंपनीवर छापा टाकला. तेथून मोठय़ा प्रमाणावर एमडी जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. जप्त करण्यात आलेल्या एमडीची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत शंभर कोटी रुपये असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या कारवाईसंदर्भात कुरकुंभ एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली नव्हती. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. मुंबई पोलिसांकडून या कारवाईविषयी कमालीची गोपनीयता पाळण्यात आली. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांकडे या कारवाईविषयी फारशी माहिती नव्हती. यापूर्वी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांवर कारवाई करून बंदी घातलेले अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.

मेफ्रेडोन या अमली पदार्थाला तस्करांकडून ‘म्यावम्याव’ असे सांकेतिक नाव देण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांत मेफ्रेडोन या अमली पदार्थाच्या आहारी अनेक तरुण गेले आहेत. पुणे पोलिसांकडून मेफ्रेडोनची विक्री करणाऱ्यांना अटक करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 1:52 am

Web Title: mumbai police raid in kurkumb industrial estate seized mephedrone
Next Stories
1 परस्पर घोषणा होत असल्याने पिंपरीच्या महापौरांची नाराजी
2 पुण्यातील १५ हजार आयटी कर्मचाऱ्यांना कपातीची धास्ती
3 टायर फुटल्याने आमदार सुमन पाटील यांच्या गाडीला अपघात
Just Now!
X