19 October 2019

News Flash

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, ‘संचेती’मधील डॉ. केतन खुर्जेकर यांचा दुर्दैवी मृत्यू

संचेतीमधील डॉक्टरसह दोघांचा जागीच मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मध्यरात्री ओझर्डे गावच्या हद्दीत बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. खासगी बसने कारला मागून धडक दिल्यामुळे हा भीषण अपघात झाला. या भीषण अपघांतामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतात एका डॉक्टरांचा समावेश असून डॉ. केतन खुर्जेकर असे त्यांचे नाव आहे. या अपघातात डॉ. खुर्जेकर यांचे चालक ज्ञानेश्वस भोसले यांचाही मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात जखमी झालेल्या डॉक्टरांची नावे जयेश पवार आणि प्रमोद भिलारे अशी नावे आहेत.

केतन खुर्जेकर हे संचेती हॉस्पिटलमधील अस्थीरोग तज्ज्ञ होते. मुंबई येथे एका कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम आटोपून माघारी येताना डॉ. केतन खुर्जेकर यांच्या कारचा टायर पंक्चर झाला. टायर बदलण्यासाठी ते आपल्या चालकाला मदत करत होते, त्याचवेळेस खासगी बसनं दोघांनाही उडवलं. आज डॉ. केतन खुर्जेकर यांचा वाढदिवस होता, अशी माहिती खुर्जेकर यांचे मामेबंधू पुष्कर तुळजापूरकर यांनी दिली आहे.

मुंबईहून पुण्याकडे जाताना उर्से टोलनाक्यापासून काही अंतरावर अपघात झाला. या अपघाताची भीषणता इतकी होती की मध्यरात्रीच्या काळोखात 2 किलोमीटर पर्यंत आवाज गेला. या अपघातचा अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहे.

(डॉ. केतन खुर्जेकर )

रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या कारला बसनं मागील बाजूनं जोरदार धडक दिली. कारचे पंक्चर झालेलं टायर बदलत असताना ही दुर्घटना घडली. अपघात इतका भीषण होता की कारचा चेंदामेंदा झाला आहे.

First Published on September 16, 2019 9:04 am

Web Title: mumbai pune express way accident 2 dead nck 90