01 March 2021

News Flash

गुटखा खाणे अंगलट; मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तरुणाचा अपघात

रुग्णालयात नेण्यासाठी तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने त्याच्यावर वेळीच इलाज करण्यात आले. त्याला पनवेल येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर काही वेळापुर्वी एक विचित्र अपघात झाला आहे. रसायनी पोलीस ठाणे हद्दीच्या जवळ चालत्या बसमधून एक प्रवासी पडल्याने हा अपघात झाला. २२ वर्षीय प्रकाश सिंग हा खासगी बसमधून प्रवास करत होता, त्यावेळी बसमधून पडून तो जखमी झाला आहे. त्याने प्रवासात गुटखा खाल्ला होता, तो थुंकण्यासाठी त्याने चालत्या बसचा दरवाजा उघडला आणि थुंकण्याचा प्रयत्न केला. बसचा वेग जास्त असल्याने तोल जाऊन तो चालत्या बसमधून खाली पडला आणि महामार्गावर कोसळला.

सुदैवाने मागून कोणतेही वाहन नसल्याने तो या अपघातातून थोडक्याच बचावला. त्याला रुग्णालयात नेण्यासाठी तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने त्याच्यावर वेळीच इलाज करण्यात आले. त्याला पनवेल येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र चालू वाहनात अशाप्रकारे निष्काळजीपणे वागणे अतिशय धोकादायक आणि जीवावर बेतणारे ठरु शकते. तसेच व्यसनाचाही वाईट परिणाम होतो त्यामुळे प्रवाशांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2018 12:14 pm

Web Title: mumbai pune express way accident happen because of gutka
Next Stories
1 भूमीवरील लोकांचे हित साधणे हाच खरा राष्ट्रवाद
2 बनावट कागदपत्रांद्वारे बँकेची एक कोटींची फसवणूक
3 ‘लोकसत्ता गणेशोत्सव स्पर्धे’ला मंडळांबरोबरच सोसायटय़ांचाही प्रतिसाद
Just Now!
X