‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’च्या दुरूस्तीच्या कामाला सोमवारपासून सुरूवात झाली असून, ११ मार्चपर्यंत ‘एक्स्प्रेस वे’च्या तीनपैकी एक लेन बंद राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन राज्य रस्ते विकास मंडळाने(एसएसआरडीसी) केले आहे.
अमृतांजन पूल ते खंडाळा बोगद्यादरम्यान एक लेन दरड दुरूस्तीसाठी बंद करण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी या मार्गाची दुरूस्ती करण्यासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे. या काळात मुंबई-पुणे जुना महामार्ग वाहतुकीसाठी खुला राहणार आहे. या मार्गावर पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी दरडदुरुस्तीचे काम करण्यात आले होते.