News Flash

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

पुण्याच्या दिशेने झाली वाहतूक कोंडी

संग्रहित छायाचित्र

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या खालापूर टोल नाक्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगा २ किमी पर्यंत गेल्या आहेत. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पुण्याला जाणाऱ्या मुंबईकरांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काही वाहनं टोल न घेता सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लक्ष्मीपूजन शनिवारी पार पडलं. सोमवारी पाडवा आणि भाऊबीज असे दोन्ही सण आहेत. त्यामुळे पुण्यात जाणाऱ्या मुंबईकरांची संख्या वाढली आहे.

एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अखेर विनाटोल वाहनं सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. खालापूर टोल नाक्यावरुन पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या टोल न घेता सोडल्या गेल्या त्यानंतर ही वाहतूक कोंडी काही प्रमाणात आटोक्यात आली.

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. मुंबई पुणे एक्सप्रेस वे च्या टोल दरात एप्रिलमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यामुळे कार किंवा जीपसाठी २३० ऐवजी २७० रुपये मोजावे लागतात. तर मिनी बसला ३५५ ऐवजी ४२० रुपये द्यावे लागतात. मोठ्या लक्झरी बससाठी ६७५ ऐवजी ७९७ रु. टोल आकारला जातो. सर्व प्रकारच्या वाहनांचे टोल दर हे ४० ते १२० रुपयांनी वाढवण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 11:38 am

Web Title: mumbai pune express way traffic jam near khalapur toll naka scj 81
Next Stories
1 राज्यात थंडीत घट, पावसाची शक्यता
2 करोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्याने पुण्यातील सारसबाग बंद
3 दिवाळीत वाचनाची टाळेमुक्ती
Just Now!
X