15 December 2017

News Flash

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कारची ट्रकला धडक, दोन गंभीर जखमी

अपघातानंतर ट्रक चालक फरार

पुणे | Updated: June 19, 2017 5:16 PM

अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर कामशेत बोगद्यात अपघाताने आठवड्याची सुरुवात झाली. सोमवारी कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातामध्ये कारमधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. यात एका महिलेचा समावेश आहे. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मोटार कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी कारने भरधाव वेगाने समोरच्या ट्रकला धडक दिली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेबद्दलची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ज्या ट्रकला धडक बसली तो ट्रक चालक न थांबता फरार झाला आहे. अपघातामुळे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक काही विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी तात्काळ वाहतूक सेवा सुरळीत केली.

First Published on June 19, 2017 5:16 pm

Web Title: mumbai pune highway truck and car accident two seriously injured