मुंबई- पुणे जुन्या महामार्गावरील अपघातात बहिरट कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. यात ८३ वर्षांच्या चंद्रसेन बहिरट यांचा देखील समावेश असून जगन्नाथ यांची पत्नी प्रमिला या दुसऱ्या कारमध्ये बसल्याने बचावल्या. पतीच्या निधनाने प्रमिला यांना मानसिक धक्का बसला आहे.

रविवारी मुंबई- पुणे जुन्या महामार्गावरील कार्ला फाट्याजवळ मोटारींची समोरासमोर धडक होऊन आठ जणांचा मृत्यू झाला. यात मुंढवा येथील कला शंकर येथे राहणाऱ्या बहिरट कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. जगन्नाथ चंद्रसेन बहिरट (वय ८३), त्यांचा मुलगा राजीव (वय ५२), सून सोनाली (४६), नात जान्हवी (वय २०) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
बहिरट कुटूंबातील २० सदस्य दर पावसाळ्यात सहलीला जातात. यंदा देखील बहिरट कुटूंबीय लोणावळा येथे फिरायला गेले होते. बहिरट कुटुंबाच्या एकूण पाच कार होत्या. यातील जगन्नाथ बहिरट, त्याचा मुलगा राजीव, सून सोनाली आणि नात जानव्ही हे संट्रो कारमध्ये बसले होते. जगन्नाथ बहिरट यांची पत्नी प्रमिला या देखील त्यांच्यासोबतच फिरायला गेल्या होत्या. मात्र, कारमध्ये जागा नसल्याने प्रमिला या दुसऱ्या कारमध्ये बसल्या. मात्र, ही पतीची शेवटचे भेट असेल, असे प्रमिला यांना स्वप्नातही वाटले नसेल. कार्ला फाट्याजवळ जगन्नाथ बहिरट यांच्या कारचा अपघात झाला आणि कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला.

Pune Accident: मोठ्या भावाचे ऐकले असते तर प्रतीक वाचला असता

वडिलांनी प्रेमाने दिलेल्या गाडीच्या अपघातात कृष्णाचा मृत्यू

जगनाथ बहिरट हे पोस्ट खात्यातून निवृत्त झाले होते. तर त्यांचा मुलगा राजीव हा थरमॅक्स कंपनीत कामाला होता. सून सोनाली या गृहिणी होत्या.

जान्हवीचे ते स्वप्न अर्धवटच राहिले
बीएससीच्या तिसऱ्या वर्षात शिकणारी आणि भरत नाट्यमची आवड असणाऱ्या जान्हवीला नृत्यात करिअर करायचे होते. अनेक कार्यक्रमात सहभागी होऊन तिने बक्षीसदेखील मिळवले होते.  त्या दृष्टीने जान्हवी या तयारी करत होती.  मात्र, हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच तिचा मृत्यू झाला.