पुणे : महापालिका हद्दीमध्ये नव्याने २३ गावांचा समावेश करण्यासंदर्भातील प्रक्रिया राज्य शासनाकडून सुरू करण्यात आली असून राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने त्याबाबतचा अभिप्राय महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागितला आहे. दरम्यान, महापालिके पुढील आर्थिक संकट आणि यापूर्वी समाविष्ट करण्यात आलेल्या ११ गावांतील अपुरी विकासकामे पाहता एकदम सर्वच २३ गावांचा समावेश महापालिका हद्दीत होण्याची शक्यता धूसर आहे.

महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांमध्ये अद्यापही पायाभूत सुविधांचे जाळे महापालिके ला निर्माण करता आलेले नाही. रस्ते, आरोग्य, मलनिस्सारण, घनकचरा, शिक्षण अशा पायाभूत सुविधांचा आराखडा प्रस्तावित आहे. मात्र पायाभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यासाठी महापालिके ला शेकडो कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. सध्या महापालिके ची अवस्था उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी झाली आहे. करोना संकटामुळे उत्पन्नावर थेट परिणाम झाला आहे. त्यामुळे एकदम गावे महापालिके त समाविष्ट करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने ती घेण्यात येण्याची दाट शक्यता असून तसे संके त सत्ताधारी आणि प्रशासकीय पातळीवरून देण्यात आले.

महापालिका हद्दीमध्ये एकूण ३४ गावांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यापैकी ११ गावे ऑक्टोबर २०१७ मध्ये समाविष्ट करण्यात आली. ही गावे समाविष्ट करताना उर्वरित गावांचा महापालिका हद्दीत तीन वर्षात समावेश करण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाकडून देण्यात आले होते. ही मुदत संपुष्टात येण्यास काही कालावधी राहिला असल्यामुळे गावांच्या समावेशाची प्रक्रिया राज्य शासनाकडून सुरू झाली आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने त्याबाबत  यापूर्वी ११ गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आल्यामुळे उर्वरित २३ गावांच्या समावेशाची ही प्रक्रिया होणार आहे. म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक, पिसोळी, कोंढवा-धावडे, न्यू कापरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नºहे, मंतरवाडी, होळकरवाडी, औताडे, हांडेवाडी, वडाची वाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी आणि वाघोली ही गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. यापूर्वी ११ गावांचा समावेश करण्यात आल्यामुळे महापालिके चे भौगोलिक क्षेत्रही वाढले आहे. मात्र,त्याचा ताण पायाभूत सुविधांवर पडत आहे.