25 October 2020

News Flash

हॉटेलसमोर लघुशंका केल्याने झालेल्या भांडणानंतर अपहरण करत केला खून

पाच आरोपींनी केले होते अपहरण ;खून करत आहे असे फोनद्वारे कळवले होते

पिंपरी-चिंचवडमध्ये हॉटेलच्या समोर लघुशंका केल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एकाचे अपहरण करून, खून केल्याची घटना पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. हितेश गोवर्धन मूलचंदानी (वय-२४) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. घटनेप्रकरणी रोहित किशोर सुखेना (वय-२६) यांनी फिर्याद दिली आहे.

अमीन फिरोज खान, शाहबाज सिराज कुरेशी, अरबाज शेख, अक्षय भोसले आणि लंगडा अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील काही गुन्हेगारांवर खून केल्याचा गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहित, साहिल ललवाणी, कैलास पाटील, लखन सुखेना, मृत हितेश हे सर्वजण पिंपरी येथील हॉटेल कुणाल येथे होते. यातील फिर्यादी रोहित हा हॉटेल मालक असून सर्वजण आत बसले होते. तेव्हा, आरोपी चारचाकी गाडीतून येऊन हॉटेलमध्ये बिअर घेण्यासाठी आले. यावेळी आरोपी अमीनने हॉटेलच्या गेट जवळ लघु शंका केली. सदर ठिकाणी लघु शंका करू नका, असे सांगण्यात आले असता आरोपीने साथीदाराच्या मदतीने साहिल ललवाणी यास शिवीगाळ केली, तसेच अमीनने हॉटेलमधील कैलास पाटील यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. यांनतर दोन्ही गटात वाद सुरू झाला, या वादात मृत हितेश मूलचंदानी पडला व त्याने आरोपींमधील एकाला पकडून ठवले तर बाकीचे आरोपी पळून गेले. तेव्हा, हितेश आणि आणखी एकाने त्यांचा पाठलाग केला आरोपींनी हितेशला पकडून ठेवले. तर फिर्यादी यांच्या तावडीत सापडलेल्या आरोपीला सोडवण्यासाठी फोनवर बोलणे झाले. तेंव्हा, आम्ही हितेशचा खूण करणार असल्याचे म्हणत त्याला चाकू आणि कोयत्याने वार करत ठार केले. घटनेप्रकरणी अमीनला ताब्यात घेण्यात आले असून, चारजण फरार आहेत. घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 7:17 pm

Web Title: murder after abduction msr 87
Next Stories
1 किरकोळ वादातून तरूणाचे होणाऱ्या पत्नीवर चाकूने वार
2 पोलिसांनी वाचवले गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे प्राण
3 पुणे – दुर्दैवी ! वाढदिवशीच त्याला गाठले मृत्यूने
Just Now!
X