पुण्यातील सिंहगड रोडवरील फन टाईम थिएटरसमोर एका तरुणावर तीन ते चार जणांनी सपासप वार केले. या हल्ल्यात शिर धडापासून वेगळे झाले असून या घटनेत त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सिंहगड रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास सिंहगड पोलीस करीत आहे. रोहित साळवी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोडवरील फन टाईम थिएटरजवळ आज दुपारच्या सुमारास रोहित साळवी या तरुणावर तीन ते चार जणांनी सपासप वार केले. या हल्ल्यात रोहितचे शिर धडापासून वेगळे झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून हल्लेखोरांचा शोध घेतला जात असल्याची माहिती देण्यात आली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 27, 2019 6:56 pm