पुण्यातील पाषाण येथील एका केमिकल कंपनीत पीएचडी करीत असलेल्या तरुणाची सुस येथील खिंडीत गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सुदर्शन उर्फ बाल्या बाबुराव पंडीत (वय ३०, रा. सुतारवाडी तर मुळचा राहणारा जाफराबाद ) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शन हा पाषाण येथील एका केमिकल लॅब्रॉटरीमध्ये रसायनशास्त्र विषयात पीएचडी करण्यासाठी दीड वर्षांपूर्वी पुण्यात आला होता. तो सुतारवाडी परिसरामध्ये राहत होता. दरम्यान, आज(शनिवार) सकाळच्या सुमारास सुस खिंडीत एक मृतदेह असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानुसार घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता. सुदर्शनचा मृतदेह आढळून आला.

सुदर्शनच्या अंगावर कपडे नव्हते व गळ्यावर वार करून, ओळख पटू नये यासाठी चेहरा दगडाने ठेचण्यात आला होता. मात्र बाजूला पडलेल्या पँटचे खिसे तपासल्यावर त्यामध्ये आधारकार्ड आढळून आले. त्यानंतर त्याचा भावाचा शोध घेऊन त्याला याबाबत सांगण्यात आले. या खुना मागील कारण अद्यापपर्यंत कारण समजू शकले नसल्याचे चतुःशृंगी पोलिसांनी सांगितले आहे.