फर्निचरचा व्यवसाय करणाऱया एका व्यक्तीचा धारदार शस्त्रांनी शुक्रवारी सकाळी अज्ञात व्यक्तीने खून केला. रफीक सत्तार शेख (वय ४५, रा. मिठानगर) असे या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
शुक्रवारी सकाळी कात्रज भागातील गोकूळनगरमधील रोहिदास मठाजवळ हल्लेखोरांनी शेख यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. त्यानंतर हल्लेखोर तेथून पळून गेले. हल्ल्यामध्ये शेख यांचा मृत्यू झाला. पोलिस याप्रकरणी हल्लेखोरांचा शोध घेताहेत.