12 August 2020

News Flash

पुण्यात सराईत गुन्हेगाराचा घरात घुसून खून

या अगोदरही झाला होता हल्ला: कोंढवा परिसरात खळबळ

प्रतिकात्मक छायाचित्र

पुण्यातील कोंढवा परिसरात राहणार्‍या एका सराईत गुन्हेगाराचा, त्याचा राहत्या घरात घुसून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घनश्याम पप्पू पडवळ असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, घनश्याम पप्पू पडवळचा व्याजाचा धंदा होता.  शिवाय, तो एक सराईत गुन्हेगार देखील होता. यापुर्वी ही त्याच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती.

आज घनश्याम पडवळ याच्या घरात घुसून हल्लेखोरांनी त्याच्यावर शस्त्राने अनेक वार केले. यामुळे  त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे कोंढवा पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 2:23 pm

Web Title: murder of a criminal in pune msr 87 svk 88
Next Stories
1 ठाणे, पुण्याला पुन्हा कुलूप
2 एमपीएससीच्या अभ्यासक्रमात बदल
3 कोकणसह घाटमाथा परिसरात पाऊस
Just Now!
X