News Flash

दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्या मुलाचा केला खून; आई, वडील आणि भावाला अटक

आरोपी नातेवाईकांनी आपला गुन्हा कबूल केला आहे.

संग्रहित छायाचित्र

दारूच्या नशेत असणाऱ्या आपल्या पोटच्या मुलाला घरातील व्यक्तींनी ठार मारल्याची घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. याप्रकरणी आई, वडील आणि भाऊ यांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, विजय रामदास वखरे (वय २८) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर गणेश रामदास वखरे (वय ३०), रामदास श्रीधर वखरे (वय ५०), चंचल रामदास वखरे (वय ४६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र सुखदेव मुदळ यांनी फिर्याद दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड पोलीस ठाण्याच्या परिसरात घरगुती वादातून पोटच्या मुलाचे हात-पाय बांधत दोरीने गळा आवळून खून केल्याचं समोर आलं आहे. अगोदर ही आत्महत्या असल्याचं भासवण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर पोलीस चौकशीत तो खून असल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला असल्याचे वाकड पोलिसांनी सांगितले. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वी दारु प्यायल्यानंतर विजय याचा घरातील व्यक्तींसोबत वाद झाला होता. त्यात त्यानं घरातील व्यक्तींना चावा घेत चाकूने मारहाण केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. दारू प्यायल्यानंतर तो असाच वागायचा, त्यामुळे घरातील सर्वजण त्याला कंटाळले होते. त्यामुळे कंटाळलेल्या आई, वडील आणि भाऊ यांनी विजयचे दोन्ही हात, पाय दोरीच्या साहाय्याने बांधत दोरीने गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर त्यांनी विजयने गळफास घेतल्याचा बनाव रचण्यात आला. परंतू, पोलिसांसमोर जास्त वेळ हा बनाव टिकला नाही. या घटनेचा अधिक तपास पोलीस अधिकारी चव्हाण करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2020 7:02 pm

Web Title: murder of a drunken boy mother father and brother arrested aau 85 kjp 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Happy Mothers day : मायेची कळ व उन्हाची झळ सोसणारी खाकी वर्दीतील कर्तव्यदक्ष ‘आई’
2 येत्या वर्षांत शाळांकडून शुल्कवाढ नको!
3 पुण्यात लॉकडाऊनमुळे अडकलेले 1 हजार 131 नागरिक रेल्वेने लखनऊकडे रवाना
Just Now!
X