News Flash

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराकडून गरोदर प्रेयसीचा खून

गळा दाबून खून केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात दाखल

प्रतीकात्मक छायाचित्र

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरात एक धक्कादायका घटना घडली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका प्रियकराने आपल्या गरोदर प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोनमानी कान्हू सोरेन (वय २४) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे व किरण बाळासाहेब फुंदे (रा. राजगड प्लाझा, कारेगाव शिरूर) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

या घटनेबद्दल पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत म्हणाले की , शुक्रवारी एक तरुण गोंधळलेल्या अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आला. त्यावेळी त्याने कर्मचाऱ्यांकडे पेन आणि एक कागद मागितला. त्यावर त्या तरुणाने “सर मी डिप्रेशनमध्ये आहे आणि या अवस्थेत माझ्याकडून एक खून झाला आहे. मी माझ्या प्रेयसीचा गळा दाबून जीव घेतला आहे. मला फाशी द्या.”, असा मजकूर लिहून तो कागद पोलिसांकडे दिला. तसेच रूमला बाहेरून लॉक लावून आलो आहे, असे सांगून रूमची किल्ली पोलिसांकडे  दिली.

यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता. तरुणी मृत अवस्थेत आढळून आली. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतर या घटनेबाबत आरोपी किरण बाळासाहेब  शिंदे यांच्याकडे चौकशी केली असता. तो म्हणाला की, “रांजणगाव एमआयडीसीमधील एका कंपनीत मी व सोनमानी मागील अनेक महिन्यांपासून एकत्र काम करत होतो. आमच्या दोघात सुरुवातीला मैत्री होती. त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आम्ही  एकाच ठिकाणी कामाला असल्याने, शिरूरमधील कारेगाव येथील राजगड प्लाझा या सोसायटीत राहू लागलो. आमच्यात शारिरीक संबंध निर्माण झाल्याने, सोनमानी दोन महिन्याची गरोदर राहिली होती. पण आम्हाला ते बाळ नको होते. ऑपरेशन करण्यास खूप पैसे लागणार होते आणि आमच्या दोघांकडे पैसे नव्हते. दरम्यान आमच्या दोघात शुक्रवारी वाद झाला. या वादात मी तिचा गळा दाबून खून केला.” आरोपी किरणला अटक केली असून या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2020 1:45 pm

Web Title: murder of a pregnant girlfriend by a boyfriend living in a live in relationship msr 87 svk 88
Next Stories
1 आसाम, केरळमधील पुरामुळे चहाची दरवाढ
2 पुण्यात एका दिवसात आढळले १०७३ नवे करोना रुग्ण, पिंपरीत ९७८ रुग्ण
3 महाविकासआघाडीत अंतर्गत कलह वाढलेला आहे : फडणवीस
Just Now!
X