News Flash

एकतर्फी प्रेमप्रकरणातून महिलेची भर रस्त्यात हत्या; आरोपीचाही आत्महत्येचा प्रयत्न

चिखली परिसरात दिवसाढवळ्या घडला थरार

चिखली : दिवसाढवळ्या भर रस्त्यात एकतर्फी प्रेमातून तरुणाने महिलेला धारदार चाकूने भोसकले.

पिंपरी-चिंचवडमध्ये एकतर्फी प्रेमप्रकरणातून एका विवाहित तरुणाने एका विवाहित महिलेचा भर रस्त्यात धरदार चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. महिलेवर हल्ला केल्यानंतर आरोपीने स्वतःच्या पोटात चाकूने वार करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी दुपारच्या सुमारास चिखली परिसरात ही घटना घडली. यात आरोपी तरुण गंभीर जखमी झाला आहे तर संबंधित महिलेचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती चिखली पोलिसांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, अरविंद शेषेराव गाडे (वय ३०) असं आरोपीचं नाव आहे. त्याच एका २९ वर्षीय विवाहित महिलेवर एकतर्फी प्रेम होतं. दरम्यान, मृत महिलेला तीन मुलं तर जखमी आरोपीला दोन मुलं आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अरविंदचं या महिलेवर एकतर्फी प्रेम होतं. तो तिच्याशी वारंवार बोलण्याचा प्रयत्न करीत होता. मोबाईलवर फोन करून त्रासही देत होता. हे प्रकरणी काही दिवसांपूर्वी त्या महिलेच्या पतीच्या कानावर गेलं त्यानंतर त्यांनी आरोपी अरविंदला समजावून सांगितलं. मात्र, त्याचं कृत्य पूर्वीप्रमाणेच सुरु असल्याने अखेर संबंधित महिलेनं आपला मोबाईल क्रमांक बदलला. त्यामुळे अरविंद जास्तच संतापला.

दरम्यान, आज (दि.०१) दुपारी संबंधित महिला कामावरून घरी येत असताना आरोपीने संधी साधून भर रस्त्यात तिला अडवून बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांमध्ये वाद झाल्याने अरविंदने सोबत आणलेल्या चाकूने थेट तिला भोसकलं. तसेच त्याच चाकूने त्याने स्वतःवरही वार केला. यात महिलेचा मृत्यू झाला तर आरोपी अरविंद गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2020 5:55 pm

Web Title: murder of a woman on the street over a one sided love affair accused also attempted suicide aau 85 kjp 91
Next Stories
1 पिंपरी- चिंचवड : आठ कोटींच कर्ज काढून देतो असे सांगून, डॉक्टरला ४० लाखाला फसवले
2 दूध उत्पादक शेतकरी वाचवायचा असेल, तर अनुदान द्या : चंद्रकांत पाटील
3 पुण्यात अष्टविनायक गणपती मंडळातर्फे साजरा केला जाणार सेवा उत्सव
Just Now!
X