News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये टोळी वर्चस्वातून एकाचा खून; आरोपी फरार

पंधरा दिवसांपूर्वी विरोधी टोळीच्या प्रमुखावर झाला होता हल्ला

संग्रहित छायाचित्र

पिंपरी-चिंचवडमध्ये टोळी वर्चस्वातून काही दिवसांपूर्वी एका तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला झाला होता. याचाच बदल घेण्यासाठी सराईत गुन्हेगार आक्या बॉण्ड टोळीच्या सदस्याचा शुक्रवारी रात्री पाच ते सहा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी वार करून खून केला आहे.

अनिकेत प्रकाश रणदिवे (वय २०) असे खून करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. तर आशितोष कदम, पिल्या गायकवाड, अजय चव्हाणसह इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रकाश महादू रणदिवे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. या घटनेप्रकरणी चिखली पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे.

पिंपरी-चिंचवड परिसरातील घरकुल येथे नेहमी काही ना काही घटना घडत असतात. आक्या बॉण्ड आणि अमित चव्हाण या दोघांमध्ये टोळी वर्चस्वातून अनेकदा वाद झालेले आहेत. दरम्यान, १५ दिवसांपूर्वी यावरू च अमित चव्हाण याच्यावर खुनी हल्ला झाला होता. याचाच बदल घेण्यासाठी शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास आक्या बॉण्ड टोळीचा सदस्य असलेल्या अनिकेत रणदिवे याच्यावर पाच ते सहा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी सपासप वार करीत त्याला गंभीर जखमी केले.

त्यानंतर अनिकेतवर रुग्णालयात उपचार सुरू झाले मात्र रात्री उशिरा त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी फरार आरोपींचा चिखली पोलीस शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 11:50 am

Web Title: murder of a yougster in pimpri chinchwad due to gang war the accused absconded aau 85 kjp 91
Next Stories
1 राज्याचे पॅकेज लवकरच
2 अंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू
3 आषाढीची पायी वारी रद्द
Just Now!
X