पिंपरी-चिंचवडमध्ये एका तरुणाचा नाहक बळी गेल्याची घटना उघडकीस आली असून, कोयते आणि दगडी पाटा डोक्यात घालून त्याची  निघृण हत्या करण्याता आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आले असून हत्येच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर सहा अल्पवयीन मुलांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शंकर गोविंद सुतार वय- २३ असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी मुख्यसूत्रधार विनोद उर्फ पप्प्या राकेश पवार वय- २१, अजय उर्फ एबी गणेश भिसे वय- २० अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी पप्प्या पवार आणि अर्जुन पात्रे नावाच्या तरुणाचे एकमेकांकडे रागाने बघण्यावरून वाद होता. यातूनच अर्जुन पात्रेला मारायचं असं आरोपींनी ठरवले व त्यानुसार शनिवारी मध्यरात्री त्याच्या घराचा दरवाजा ठोठावला. परंतु, तो तिथे नव्हता. त्याच्या घराचा समोर शंकर सुतार हा झोपलेला होता. आधीच रागात असलेले आरोपी यांनी शंकरला झोपेतून उठवलं व तो काही बोलण्याच्या आत त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. यानंतर, शंकरचा त्याच दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या घटने प्रकरणी सहा अल्पवयीन मुले आणि दोन आरोपी घटनस्थळावरून फरार झाले होते. पिंपरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासांतच दोन मुख्य आरोपींना जेरबंद करत सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पोलीस तपासात शंकरचा नाहक बळी गेल्याच पुढे आले आहे. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांच्या पथकाने केली.