News Flash

बहिणीकडे पाहणाऱ्यास जाब विचारणार्‍या तरुणाचा खून

पुण्यातील येरवडा भागात घडली घटना

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

मामाच्या मुलीकडे का पाहतो असा जाब विचारणार्‍या तरुणाचा खून झाल्याची घटना पुण्यातील येरवडा भागात घडली आहे. या घटनेचा तपास येरवडा पोलिस करत आहेत.

आदर्श काकडे (वय २२ रा. येरवडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसानी  दिलेल्या माहितीनुसार, येरवडा येथील मच्छी मार्केट परिसरात राहणार्‍या आदर्श काकडेच्या मामाच्या मुलीकडे काही मुले सातत्याने पाहत असत. याबाबत आदर्शने या मुलांना तिच्याकडे का पाहते रे असा जाब विचारला असाता, सात ते आठ जणांनी त्याच्यावर कोयता आणि कुर्‍हाडीने वार केले. यात आदर्श याचा घटनास्थळीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 2:07 pm

Web Title: murder of youth in yerwada msr87
Next Stories
1 लोणावळा-पुणे लोकलला रोजचा उशीर, संतापलेल्या प्रवाशांचा रेल रोको
2 पुण्यात पालख्यांच्या बंदोबस्तासाठी चाललेल्या पोलिसाचा अपघाती मृत्यू
3 शहरात मुसळधार पाऊस ; एका तासात ७१ मि.मी.ची नोंद
Just Now!
X