15 July 2020

News Flash

गायिका बेला शेंडे यांच्याशी शुक्रवारी संगीत-संवाद

बेला यांच्या संगीत क्षेत्रातील वाटचालीबद्दल अभिनेते पुष्कर श्रोत्री त्यांच्याशी संवाद साधतील.

संग्रहित छायाचित्र

शास्त्रीय संगीताची पार्श्वभूमी असतानाही दूरचित्रवाणीवरील गायन स्पर्धेतील सहभाग.. ‘खुरखुरा’ या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार.. मराठी-हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रातील दिग्गज संगीतकारांसह काम.. अनेक लोकप्रिय गाण्यांची गायिका.. हा पार्श्वगायिका बेला शेंडे यांचा सांगीतिक प्रवास अनुभवता येणार आहे. लोकसत्ताच्या ‘सहज बोलता बोलता’ या उपक्रमात शुक्रवारी (५ जून) सायंकाळी पाच वाजता हा वेब संवाद रंगणार आहे.

शास्त्रीय संगीताचे धडे घरातच गिरवल्यानंतर बेला शेंडे शास्त्रीय संगीताची वाट सोडून सुगम संगीताकडे वळल्या. दूरचित्रवाणीवरील गायन स्पर्धेद्वारे स्वत:च्या गोड आवाजाची ओळख निर्माण करून बेला यांनी मराठी चित्रपटांतील गाण्यांसह ज्येष्ठ संगीतकार इलायाराजा, ऑस्करप्राप्त ए. आर. रेहमान यांच्यासह अनेक संगीतकारांची गाणी गायली. लावणीपासून तरल, हळव्या गाण्यांपर्यंत विविध प्रकारची गाणी त्यांनी गायली आहेत. त्यामुळेच चित्रपट संगीत क्षेत्रात बेला शेंडे हे सध्याचे आघाडीचे नाव आहे. बेला यांच्या संगीत क्षेत्रातील वाटचालीबद्दल अभिनेते पुष्कर श्रोत्री त्यांच्याशी संवाद साधतील.

सहभागी होण्यासाठी

https://tiny.cc/LS_SahajBoltaBolta_5June या लिंकवर जाऊन नोंदणी करा.

या उपक्रमाचे लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी सहप्रायोजक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 12:35 am

Web Title: music dialogue with singer bella shende on friday abn 97
Next Stories
1 वाहनदुरुस्ती व्यवसायाला अवकळा
2 ‘नेट’ लांबणीवर
3 वर्तुळाकार मार्गात ‘अडथळे’
Just Now!
X