भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रात वाद्यांची ओळख या मालिकेत प्रसिद्ध जलतरंग वादक मिलिंद तुळणकर यांनी मुलांना जलतरंग या वाद्याची ओळख करून दिली.
जलतरंग हे प्राचीन भारतीय वाद्य असून ते वाजविणाऱ्यांची संख्याही कमी आहे. माझ्यासमोर बसलेल्या मुलांमधून भावी वादक निर्माण होतील, असा आशावाद तुळणकर यांनी यावेळी व्यक्त केला. ही चौसष्ट कलांमधील एक कला आहे. या वाद्याला जलवाद्य किंवा जलतंत्री वीणा असेही म्हटले जाते. त्यात कमीतकमी बारा भांडी तर जास्तीत जास्त सव्वीस भांडी मोठय़ापासून ते छोटय़ापर्यंत अर्धवर्तुळाकार पद्धतीने मांडलेली असतात. बांबूच्या किंवा प्लास्टिकच्या काठय़ांनी हे वाद्य वाजवले जाते. भांडय़ांमधील पाण्याची पातळी कमीजास्त केल्यास स्वर बदलतात. जलतरंगाचा आवाज थेट अंतर्मनात जातो.
त्यामुळे संगीतोपचारामध्ये त्याचा वापर करतात, अशीही माहिती तुळणकर यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमात सुरुवातीला वाद्यांची ओळख करून दिल्यावर तुळणकर यांनी असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, लकडी की काठी, हम होंगे कामयाब, छोटी सी आशा.. सारखी मुलांच्या परिचयाची गाणी वाजवली. त्यांनी शेवटी यमन राग सादर केला. मालिकेतून जे मजेशीर आवाज मुलांच्या ओळखीचे आहेत ते त्यांनी मोरचंग या चिमुकल्या वाद्यातून काढून दाखवले. तुळणकर यांना तबल्यावर गणेश तानवडे यांनी साथ केली. सीमा अंबिके यांनी प्रास्ताविक केले तर माधुरी सहस्रबुद्धे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

 

vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन