News Flash

दफनभूमीच्या मागणीसाठी पुणे महापालिकेच्या आवारात मृतदेह आणून आंदोलन

मागील तीन वर्षांपासून दफनभूमीची मागणी केली जाते आहे

पुण्यातील खराडी भागात दफनभूमी उभारली जावी ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होतं आहे. त्याचमुळे मुस्लिम बांधवांनी मृतदेह महापालिकेच्या आवारात आणून आंदोलन केले. माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी या आंदोलनाचे नेतृत्त्व केलं.

खराडी भागात दफनभूमी झालीच पाहिजे अशी मागणी पठारे यांनी यावेळी केली. . या मागणीसाठी तीन वर्षांसून पत्रव्यवहार करून देखील सत्ताधारी पक्ष आणि प्रशासन याकडे लक्ष देत नाही. त्या पार्श्वभूमीवर निषेध व्यक्त करण्यासाठी आज महापालिकेत बेवारस मृतदेह आणावा लागला आहे. या प्रश्नावर लवकरच दफ भूमिचा प्रश्न मार्गी लावू असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले आहे. या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 5:21 pm

Web Title: muslim community protest with dead body for cemetery in kharadi pune
Next Stories
1 पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या भाजपाकडे
2 पुणे – ढेकूण घालवण्यासाठी पेस्ट कंट्रोल करणं जीवावर बेतलं, दोन तरुणांचा मृत्यू
3 अमोल कोल्हे यांच्या प्रवेशानंतर नाराजीनाटय़
Just Now!
X